गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तद्नंतरम्. | अनुस्वरः परतरः | अर्धेंदुलसितं | तारेण ऋद्धम् | एतत्व मनुस्वरूपम् |गकारः पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् | अनुस्वारश्र्चांत्यरूपम् | बिंदुरूत्तररूपम् | नादः संधान अ | संहिता संधिः | सैषा गणेशविद्धा | गणक ऋषिः | निचृद्गायत्री छंदः | गणपतिरदेवता | ॐ गँ गणपतये नमः ||7|| एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंति प्रचोदयात् ||8
गण शब्दातील पूर्व वर्णाचा प्रथम उच्चार करून त्यानंतर वर्णाचा उच्चार करावा. ग वर अनुस्वार आला की वर्ण बनेल. या ‘ ग ‘ ‘ वर असा अनुस्वार लावायचा अर्धचंद्रासारखा ‘ ग ‘ला या सुशोभित करणारा. असावा. या अर्धचंद्राने ग चे ` गँ `हे रूप तयार झाले. हे देवा ॐ गँ हे तुझ्या एकाक्ष मंत्राचे स्वरूप आहे. मंत्र ही महाशक्ती आहे. गकार हे पूर्वरूप आहे तर अकार हे मध्यमरूप आहे. अनुस्वार हे अन्त्यरूप आहे. व नाद हेच संधान आहे. ॐकारच गँ आहे व गँ च ॐकार आहे. ही श्री गणेश विद्या आहे. ॐकार व गँ चे एकरूपत्व समजून घेणे हीच गणेशविद्या आहे. म्हणून श्री गणेशच परब्रह्म परमात्मरूपात वेदोपनिषदांनी स्तविले आहेत. या विद्येचा द्रष्टा गणक नावाचे ऋषी आहेत व छंद निचृद गायत्री, असून देवता गणपती आहे. गायत्री म्हणजे गायनाच्या माध्यमातून तारून नेणारी. तरी या मंत्ररूप गणपतीला नमस्कार असो. मंत्र असा. “ ॐ गँ गणपतये नमः ‘”गायत्री मंत्र – – त्या एकदंताला आम्ही जाणतो. त्या वक्रतुंडाचे ध्यान करतो. बुद्धीत स्मरतो. सदासर्वकाळ त्याच्याच मनन व चिंतनात असतो. ते दन्ती आम्हाला प्रेरणा देवो. मंत्ररूपात ॐकार आणि गँ चे एकत्व आणि गायत्री रूपात एकदंत, वक्रतुंडाय प्रार्थना हाच अथर्वता प्रक्रियेचा मार्ग आहे.
एकदंत चतुरहस्तं पाशमंकुश धारिणम |रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् | रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् | रक्तगंधानुलिप्तांगं रक्पुष्पैः सुपूजितम् | भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् |आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरूषात्परम् | एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः||9|| नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमुर्तये नमः ||10||
श्री गणेशांनी चार हात असून त्यांनी आपल्या प्रत्येक हातात पाश म्हणजे फास, दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्यासाठी , अंकुश म्हणजे माहुताच्या हातातील हत्यार ज्याने दुष्ट व उन्मत्त शक्तीला वठणीवर आणण्यासाठी, परशू दुष्ट शक्तीच्या समूळ उच्चाटन करीता. खालील दोन हातात मात्र अर्धा तुटलेला दात व वरदमुद्रा असते. व चौथ्या हातात मोदक असतो. त्याच्या ध्वजावर मूषक चिन्ह आहे. हा मूषक हे काळाचे प्रतिक आहे. हा मूषक काळालाही कुरतडत आहे.
रक्तवर्णाचे वस्त्र परिधान केलेला, ज्याच्या अंगावर रक्तचंदनाची उटी काढलेली आहे रक्तर्वर्णी फुलांनी सुशोभित केले आहे.हा रक्तवर्ण म्हणजे लाल रंग थांबण्याचा आहे. गती रहित होण्याचा रंग आहे लाल.त्याचबरोबर त्याचे कान सुपासारखे मोठे आहेत. जणू काही सर्वच गोष्टी नीट पाखडून स्वच्छ करूनच वाईटाचा त्याग करूनच ते श्रवण करत असतात. त्याच्या मनात आपल्या प्रत्येक भक्ताविषयी पूर्ण दया असून वत्सलता पण आहे. सर्व जगाचे नियंत्रण करणारा अखंड, अविनाशी, आहेत. प्रकृतेः पुरूषात् परम् असे संबोधून त्यांच्या परब्रह्म तत्वालाच महत्व दिलेले आहे. प्रकृती व पुरूषाहून पर असलेला पण सृष्टीच्या पूर्वीच सगुण रूपाने प्रादुर्भूत झालेला अशा या अशा परब्रह्म स्वरूपामधील श्री गणेशाचे चिंतन व पूजन करतात तेच योगी योग्या मधे श्रेष्ठ ठरतात. पुढे आठ नावांच्या माध्यमातून अथर्वशीर्षााचा समारोप केला आहे. व्रातपती, गणपती, प्रमथपती, लम्बोदरं, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत, वरदमूर्ती, या प्रत्येक नावाने नमस्कार केलेला आहे. आता या आठ नावांची थोडक्यात माहिती घेऊया.
नमः व्रातपतये—मूळ शब्द नियम. नियम म्हणजे व्रत. आसक्तीचे मूळ म्हणजे जड शरीर होय. देहाची आसक्ती, लोभ, देहबुद्धी हे सर्वच थर्वतेचे कारण आहेत. येथे जड देहाचा विचार केलेला आहे. व हे सर्व दूर करण्याचे कार्य होते फक्त आणि फक्त श्री गणेशाच्या चिंतनाने.
नमो गणपतये ः—जड म्हणजेच शरीर. शरीरातील स्नायू, हाडे, मज्जातंतू मिळून बनणारी जी इंद्रिये आहेत त्या इंद्रियांच्या ज्या देवता आहेत त्यांना गण असे म्हटले आहे. म्हणून शरीराला चैतन्य देणार्या इंद्रियांच्या चालक शक्तीला म्हणजेच त्यांना गणांच्या अधिपतीला गणपती ना नमस्कार असो.
नमः प्रमथपतये ः—मूळ शब्द घुसळणे. मंथन करणे. मन, बुद्धी, चित्त व अहंकार याम्हणजेच अंतःकरण. योग्य दिशेने निर्णय घेताना बुद्धी चित्ताच्या पातळीवर अनेक विकल्पावर विचार करते व अखेर अंतःकरणाच्या पातळीवर निर्णय घेतला जातो. त्यावर नियंत्रण करणार्या संचालकास प्रमथपती म्हणता येइल तरी त्यांना नमस्कार असो.
नमः लम्बोदराय ः—प्रमथपती च्या मागे आहेत लम्बोदर. ज्यांच्या उदरातून सर्व प्रकटते व शेवटी तेथेच लय पावते ते गणनायक लम्बोदर. त्यांना नमस्कार असो.
नमः एकदंताय ः—श्री लम्बोदर हे एकदन्त आहे. या एकदंत तत्त्वात मायेच्या अतीत. एकमेव सत्तेचा विचार केला आहे. श्री गणेशाचा डावा दात तुटलेला आहे तो वाईट, अमंगल अपवित्र अशी अपूर्णता दाखवतो. डावेपणाची म्हणजेच मायेची सत्ता तेथे जाऊन खंडीत होते म्हणून त्याला भग्नवामरद असेही म्हटले आहे. तर उजवा दात पूर्ण आहे. जी पूर्ण मंगल सत्ता व शुद्ध आनंदमयी सत्ता आहे त्याना नमस्कार असो.
नमःविघ्ननाशिने ः—थर्वतेमधे अडकलेल्या व अथर्वतेच्या आड येणार्या प्रत्येक बाबीला विघ्न म्हणता येईल. तर असे हे अज्ञानरूपी भ्रम, विघ्नांचा नाश करून अथर्वतेचा मार्ग सोपा करण्यासाठी नमस्कार असो.
नमः शिवसुतायः—शिव म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा साक्षात्कार ज्याच्या. मुळे होतो ते आहेत ज्ञानगम्य भगवान शिवसुत. त्यांना नमस्कार असो.
वरदमुर्तये नमः ज्ञानगम्य भगवान हे वर देणारे आहेत. अथर्वतेचा वर सर्वात श्रेष्ठ होय. हा वर देणारे दाता हे परमात्मा मूर्त रूपात श्रीगणेश आहे. म्हणून या वरदमूर्ती ना नमस्कार असो.
आता फलश्रुती बाबत आपण एवढाच विचार करूया फलश्रुती ही फक्त प्रारंभिक स्तरावरील उपासकाना लागू पडते. खर्या साधकांना फलश्रुतीची फारशी ओढ नसते. श्रुतीला श्रुतीमाता असे म्हटले आहे. श्रुती कनवाळू आहेत. श्रुतीने फलश्रुती सांगताना नेहमी मातेचीच भूमिका घेतलेली आहे.
या श्री गणेश अथर्वशीर्षााचाी सिध्द देवता – प्रतिमेजवळ बसून एक सहस्र वा एक लक्ष जप केल्यास याचा मंत्र सिद्ध होतो.
“ स सर्व लभते स सर्व लभते ”
या अथर्वशीर्षाच्या दैनंदिन पठणाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यातील कोणत्याही पुरूषार्थाची प्राप्ती होते. जो नित्य श्री गणेशाचे दुर्वांकुरांनी पूजन करतो तो कुबेरासारखा धनसंपन्न होतो. जो लाह्या नी हवन करतो तो मोठा किर्तीमान होतो. जो सहस्र मोदकांनी श्री गणेश प्रीत्यर्थहवन करतो त्याला इष्टफल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधा चे हवन करतो त्याला कोणतेही इष्ट फळ मिळते. त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची विघ्नबाधा येत नाही.
आवर्तन म्हणताना ‘ ॐ नमस्ते गणपतये ‘ येथपासून ‘ श्री वरदमूर्तये नमः’ येथपर्यंत म्हटले म्हणजे १ आवर्तन झाले. याप्रमाणे इष्ट संख्येइतकी आवर्तने म्हणावीत. व शेवटी फक्त एक वेळ’ एतदथर्वशीर्ष ‘ पासून फलश्रुती म्हणावी. २१ आवर्तनांची १ एकादशनी होते.
कोणत्याही उपनिषद पाठापूर्वी व पाठाच्या शेवटी शांतिमंत्र म्हणावे असा विधी आहे. ||इति सार्थ श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम्. ||