श्राव़ण महिन्यातील श्रावणी पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधनाचा व सागर पूजनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मकर रास असून रविचे उत्तराषाढा हे नक्षत्र सकाळीच ७ वाजून १८ मिनिटांनी संपतेय व चंद्राचे श्रवण हे नक्षत्र सुरू होतेय. बरं झालं उत्तराषाढा संपतेय ते. कारण रवि व शनि हे काही नैसर्गिक मित्र नाहीत. त्यामुळे या दिवसाची फळे काही फारशी समाधानकारक मिळालीच नसती.
तर आपण आता मकर – श्रवणचा विचार करूया.
या दिवसापासून सुरू होणारे ग्रहमान व त्याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम बघुया. मकर राशीमधे तीन नक्षत्रे येतात. पैकी उत्तराषाढाचे ३ चरण, श्रवणचे ४ चरण, व धनिष्ठाचे २ चरण. सकाळी ७.१८ नंतर श्रवण नक्षत्र सुरू होत आहे ते ४ तारखेच्या मंगळवार सकाळी ८.१० वाजेपर्यंत आहे. आपण फक्त श्रवण नक्षत्राचा विचार करणार आहे.
श्रवण हे नक्षत्र चंद्राचे आहे. या नक्षत्राची देवता श्री विष्णु आहे. याच्या चारही चरणांवर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राचे अधिपत्य आहे. मकर राशीचा स्वामी शनी आहे व या श्रवण नक्षत्राचे दैवत विष्णु आहे. हे पृथ्वी तत्त्वाचे असून चर नक्षत्र आहे. नक्षत्राचे गुण सदाचार संपन्न, विद्वान व ईश्र्वरभक्ताचे आहेत. या सर्वांच्या मिलापाने श्रवण नक्षत्राच्या व्यक्तीमधे चंद्राचा आल्हादपणा, आनंदीपणा, कल्पनाशक्ती उत्तम असते. रास शनीची असल्याने कष्ट करण्याची पुरेपूर तयारी असते त्यामुळे यशही उत्तमपणे मिळत जाते. भगवान श्रीविष्णुची बौद्धीक क्षमता, मुत्सद्धीपणा, अशा सर्व गुणांनी युक्त असल्याने व्यक्ती आदरास प्राप्त होते.
हे नक्षत्र देवगणी आहे. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती प्रथमतः दुसर्याचे हित पाहणार्या असतात. यांचे विशेष गुण म्हणजे, अतिशय विद्वान, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, कष्टाळू, आज्ञाधारक, सच्छिल व सेवावृत्तीच्या असतात.
तरी अशा या मकर श्रवण च्या व्यक्तींना हा सप्ताह कसा जाणार आहे ते पाहुया.
३ तारखेला रवि व बुधाची युती कर्क राशीत असून ती या व्यक्तींच्या सप्तमात आहे. तुमचा लाईफ पार्टनर किंवा व्यवसाय पार्टनर यांची चांगली साथ मिळेल. व बुद्धीच्या पातळीवर वैचारिक सल्लाही मिळेल. जो व्यवसायासाठी मोलाचा ठरेल. राशीचा स्वामी शनी ४ अंश ३३ कला आहे. कर्केचा रवि १६ अंश ५९ कला व १३ विकला आहे व कर्केचा बुध १ अंश ५३ कलांचा आहे. सप्तमातील ही युती व्यवसायासाठी चांगली असून ज्यांचे नक्षत्र १० अंश ०० कला व ०० विकला ते २३ अंश २० कला व ०० इ, विकला यामधे आहे त्यांनी पुढील व्यवसायाचा विचार करायला हरकत नाही. नक्कीच लाभदायक आहे. तसेच नव्याने ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांनी पुढील क्षेत्रात काही करता येते का याचा विचार करावा.
इंजिनियरींग, वकिली प्रॅक्टिस करणारे, धान्य तेल व्यापारी, लहान कारखाने , सेल्स टँक्स इन्कमटँक्स , सल्ला, फ्रीज, पोस्ट व टेलिग्राफ खाते व पौरोहित्य करणारे. याचबरोबर मसाला, पापड लोणची तयार करणारे. पेंटींग, ड्राँईंगज करणारे आपली जे जे करण्याची क्षमता आहे व आत्मविश्वास आहे असे वाटते त्याचा विचार करावा. दुसरा मदत करणार आहे म्हणून करू नये. कारण हे देवगणी नक्षत्र असल्याने इतरांचे फंडे यांना पटणार नाहीत.
आता आपण मंगळवार ४ तारखेपासूनच्या पंधरवड्याचा विचार करूया. लग्नी शनी असल्याने व्यवहारी विचार करण्याची सवय लागेल. कोणाकडून येणे बाकी असेल तर व्यवसायाचा विचार सांगावा बाकी लवकर येईल. चतुर्थ स्थानात मंगळ हर्षल असल्याने मोठ्या उलाढाली करू नयेत. पण मंगळामुळे तूमच्या कार्याला आईकडून. विरोध होईल. तरी सर्व व्यवहार मातोश्रीना समजावून सांगावेत. पण षष्ठातील शुक्र राहू कांही प्रमाणात आनंदावर विरजण पाडतील. . महिलांनी विशेष काळजी घ्यावी. किडनीचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. मनाची शक्ती वाढवण्यासाठी सतत भीतियुक्त विचार करू नयेत. प्राणायाम, नामस्मरण याचा अभ्यास करावा.
तुम्ही करत असलेल्या प्रयत्नाचे निकाल १७/१८ आँगस्टच्या दरम्यान दिसतील. तुमच्या राशी स्वामी शनी तुमच्यातील कामाची चिकाटी वाढवणार आहे व त्या श्रवणचा चंद्र मानसिक बळ देणार आहे. धीर सोडू नये. व प्रयत्न सुरू ठेवावेत. तुम्ही मुळातच कष्टाळू आहात त्यामुळे तुम्हाला यश हे येणारच.
पुनः भेटुया पुढील आठवड्यात .
धन्यवाद!!