कृष्णमूर्ती पद्धतीने व्यवसायाबाबतचा अभ्यास

वास्तविक मला कृष्णमूर्तीवरचा पहिला लेख हा नक्षत्रांच्या माहितीवर लिहायचा होता. पण बर्‍याच जणांचे फोन आले की सध्या कोरोनाच्या काळात व्यवसाय, नोकरीतील अडचणी यांवर काही माहिती द्या. म्हणून हा आजचा लेख कोरोनाच्या काळात आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण कोणते व्यवसाय करू शकतो हे बघुया.

Basic Details
Lagna Chart
KP Lagna Chart
KP Cusp Chart
KP Spashtagraha
KP Cusp House Division
Vim. Dasa

हे व्यवसाय करण्यासाठी मला माझी कुंडली काय सांगते? तसेच कृष्णमूर्ती पद्धतीतले  व्यवसायाचे नियम कोणते याचा विचार करूया.

आपल्या कुंडलीत १२ स्थाने दाखवली आहेत. त्यांनाच भाव असेही म्हणतात. कृष्णमूर्तीच्या नियमानुसार व्यवसायाचे भाव २, ६, ७, १० व११ ही आहेत.

आणि ८ आणि १२ ही विरोधी स्थाने आहेत.

आता या स्थानांची माहिती घेऊया.

दुसरे स्थान:- यालाच द्वितीय स्थान, धनस्थान व कुटुंबस्थान असेही म्हणतात. व्यवसायाला लागणारे कर्ज, तसेच वडिलार्जित धन मिळण्याचे काही योग आहेत का? ते तपासणे. बँकेकडून ओव्हरड्राफ्ट मिळेल काय? एकूण काय तर द्वितीय स्थानावरून व्यवसायातील अर्थ विषयक सर्व प्रश्न पाहिले जातात.

सहावे स्थान :– कर्ज ओव्हरड्राफ्टसाठी द्वितीय स्थानाबरोबर सहावे ही विचारात घ्यावे लागते. कुंडलीत वडीलांचे स्थान हे नवम स्थान दाखवते. व सहावे स्थान हे नवमाचे दशमस्थान आहे. म्हणजेच दहाव्या व सहाव्या स्थानांचे संबंध जर शुभ असतील तर मुलगा / मुलगी यांना वडिलांचा व्यवसायच पुढे चालवायला मिळतो.

सातवे स्थान:–प्रत्यक्ष व्यवसाय, भागीदार, कामगारांच्या युनियन यांचा विचार होतो व सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान २ नंबरचे मारक स्थान असल्याने याच स्थानाची मदत आयुष्यमर्यादा पाहण्यासाठी होतो.

दशम स्थान :– हे कर्मस्थान आहे. नोकरी करणार की व्यवसाय करणार, व्यवसाय असेल तर कोणत्या प्रकारचा असेल, व्यवसायाची स्थिती कशी राहील याचे ज्ञान होते.. सामाजिक प्रतिष्ठा, प्रसिद्धी व यश  यासाठी याच स्थानाचा विचार करावा लागतो.

एकादश स्थान :– यालाच लाभस्थान म्हणतात. या स्थानाच्या  शुभसंकेता शिवाय माणसाची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही.

आता आपण विरोधी भाव कसे विरोध करतात ते बघुया.

o  अष्टम स्थान :– या स्थानाला मृत्युस्थान असेही म्हंटले आहे. या स्थानावरून वारसा हक्काने मिळणारे धन, तसेच गुप्तधन, याचा विचार होतो. लाचलुचपत, विम्याचे पैसे म्हणजेच इझी मनीचा विचार होतो.

o  द्वादश स्थान:– व्यवसायातील गुंतवणूक, दिवाळखोरी, बंधनयोग,व गुप्तशत्रु इत्यादीसाठी या. स्थानाचा विचार करावा लागतो.

 

आता आपण कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम बघुया.

o  दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी सप्तम भावाचा बलवान कार्येश हवा व तो चर राशीत असेल तर अशी व्यक्ती आयुष्यात व्यवसाय करू शकते. प्रश्न कुंडलीत दशमभावाचा. उपनक्षत्रस्वामी वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा. जन्म कुंडलीत वक्री असल्यास चालतो.

o  कृष्णमूर्ती पद्धती नियमानुसार

o  कुंडलीतील २,६,१०,११ही स्थाने एक दुसर्याशी बलवान कार्येशांशी संबंधित असल्यास व

o  जर ८,१२ चा काहीही संबंध येत नसल्यास व्यवसायात जबरदस्त भरभराट होते व ती व्यक्ती प्रसिद्धही होते.

o  शेवटी कार्येश ग्रहांच्या दशा /महादशाचाही  विचार  करावा लागेल.

o  आता आपण एक उदाहरण बघुया.

 

०००
प्रथम भाव :–

ग्रह रास धनु स्वामी गुरू/नक्षत्र स्वामी शुक्र/उपनक्षत्र स्वामी राहु.

राहु 6, 7 / (बुध) ( रवि)

नक्षत्र स्वामी राहु 6, 7 (बुध) ( रवि)

उपनक्षत्र स्वामी रवि 1 / 9

 

ग्रह बुध 12 / 7

नक्षत्रस्वामी केतु 12 / ( गुरू 3 / 1, 4)

उपनक्षत्र स्वामी बुध 12/ 7.

दशम भाव:–

रास तूळ स्वामी शुक्र/नक्षत्रस्वामी मंगळ/ उपनक्षत्र स्वामी बुध

ग्रह राहु 6,7/ ( बुध) (रवि)

नक्षत्रस्वामी राहु 6, 7 (बुध) (राहु)

उपनक्षत्र स्वामी रवि 1 / 9

ग्रह बुध. 12 / 7

नक्षत्रस्वामी केतु. 12 / ( गुरू 3 / 1, 4)

उपनक्षत्र स्वामी बुध 12 /7

 

प्रथम भाव हा माणसाच्या मनाचा कल, त्याची इच्छा, व कुवत याची माहिती देतो.

दशम भाव हा मनुष्य धंदा करणार आहे का याची माहिती देतो.

दशमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी ‘ बुध ‘ प्रथम व दशम या दोन्ही स्थानाशी संबंधित आहे व त्याची दृष्टी सप्तम स्थानावर आहे.

2) बुध केतुच्या नक्षत्रात असून केतूची पण दृष्टी सप्तमावर आहे.

केतू गुरूच्या धनु राशीत असल्याने तो गुरूसारखी फळे देईल.

गुरू तृतीया असून त्याची दशम स्थानावर दृष्टी आहे.

सर्वात महत्वाचा गुरू चंद्राचा नवपंचम योग आहे. वरील विवेचनावरून निष्कर्ष काय निघेल ते पाहुया. सर्व ग्रहस्थिती ही व्यवसायाला पूरक असल्याने श्री. गणेश हा नक्की व्यवसाय करेल

  1. कुंडलीतील भावारंभातील दशमस्थान असे सांगते की तूळ शून्य अंश 36 कला व 38 विकला आहे. तूळ राशीची व्याप्ती 0 अंश, 0 कला, 00 विकला ते 1 अंश, 53 कला 20 विकला या व्याप्ती मधे येणारे व्यवसाय कागदाचे व्यापारी, कर सल्लागार, क्लिअरिंग एजंटस्, कादंबरी लेखन, केटरर्स, आईस्किम निर्मिती, फिल्म उद्योग. इत्यादी आहेत. पैकी
  2. गणेश यांच्या कुंडलीत दशम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बुध असून, बुधाचा ऊपनक्षत्र स्वामी पणबुध आहे. त्यामुळे वरील शाखांपैकी करसल्लागाराचे काम करेल. कुंडली नोकरीची नसल्याने व बुध व केतुची दृष्टी सप्तमावर असल्याने श्री. गणेश हे व्यवसायच करतील. व तेही करसल्लागार म्हणून. खर सल्लागार म्हणजे कॉस्ट अकौंटंट सीए. लहान मोठे प्रवास करावे लागतील.
  3. तसेच चतुर्थ स्थानाशी पण संबंध येत असल्याने ऑफिस घराजवळच असेल.
  4. ही कुंडली पाहिली तेव्हा श्री. गणेश यांना शुक्र महादशा सुरू होती. दशम स्थानाच्या भावारंभानुसार(शुक्र /मंगळ / बुध) त्यांचे सी . ए. म्हणून काम सुरू होईल.
  • अ) शुक्र लाभात 6, 10, 11 चा स्वामी आहे.
  • ब) मंगळ शुक्राच्या नक्षत्रात आहे..
  • क) मंगळ मकर राशीत उच्चीचा असून तो भावचलितात प्रथम स्थानात आहे.
  • ड) शुक्र शनीच्याऊपनक्षत्रात आहे.
  • इ) शनी धन स्थानात असून तो द्वितीय स्थानात आहे.

रवि महादशा 19/09 2017 पर्यंत

चंद्र महादशा 19 / 05 2027 पर्यंत

मंगळ महादशा 19 /05 2034 पर्यंत.

हा सर्व कालावधी त्यांना त्यांच्या व्यवसायात भरभराट देणार आहे.

5.) सध्या ते मुंबईमधील प्रथितयश कर सल्लागार असून रविच्या महादशेत ते या व्यवसायात एकदम स्थिर झाले आहेत.

अशाप्रकारे 2011 साली पाहिलेले कुंडलीतील सर्व गणिते एकदम बरोबर आली आहेत. ही आहे कृष्णमूर्ती पद्धतीची किमया.

One thought on “कृष्णमूर्ती पद्धतीने व्यवसायाबाबतचा अभ्यास

  1. Hi mam

    Why 10th house is linked with rahu when sublord is Budh, that I couldn’t understand

    दशम भाव:–

    रास तूळ स्वामी शुक्र/नक्षत्रस्वामी मंगळ/ उपनक्षत्र स्वामी बुध

    ग्रह राहु 6,7/ ( बुध) (रवि)

    नक्षत्रस्वामी राहु 6, 7 (बुध) (राहु)

    उपनक्षत्र स्वामी रवि 1 / 9

    ग्रह बुध. 12 / 7

    नक्षत्रस्वामी केतु. 12 / ( गुरू 3 / 1, 4)

    उपनक्षत्र स्वामी बुध 12 /7

    राहू , केतूची दृष्टी केपी मध्ये मानतात का?
    राहू cusp chart मध्ये 6th house मध्ये आहे तर 7 चा कार्येश कसा?

    तसेच नक्षत्रस्वामी केतु. 12 / ( गुरू 3 / 1, 4),
    गुरु कस्प चार्ट मध्ये 4 चा कार्येश कसा ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *