समर्थांची ओळख – दासबोध व आपले जीवन
सध्याच्या काळात म्हणजे २० व्या शतकात मानवाला आपले जीवन जगताना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. मानसिक, शारीरिक, आर्थिक या बाबी फक्त स्वत: पुरत्या मर्यादित न राहता त्या समजाचा एक भागच बनल्या आहेत. मानसिक बाबींचा विचार करताना “मन” ही वैयक्तिक मालकीची बाबही वर्तमानतील एक ज्वलंत समस्या बनली आहे. बोकळलेला चंगळवाद, फायदा व प्रसिद्धीसाठी माणसा – माणसातील स्पर्धा, नात्यातील परस्परांवरील अविश्वास, कुटुंब संस्थेची दुर्दशा, त्यातून निर्माण झालेल वृद्धाश्रम यांचा विचार करताना या प्रश्नांवर उत्तरे शोधता येणारे ठिकाण म्हणजे श्री रामदास स्वामींचा दासबोध व मनाचे श्लोक होय.
वास्तविक शालेय बालवयातच या मनाच्या श्लोकांची शिकवण जर व्यवस्थित मिळाली तर तरुण वयात मानवाला इतक्या कटकटींना व अराजकतेला सामोरे जावे लागणार नाही.
समर्थ रामदासांची वाण्ड्मय संपदा अफाट आहे. ३५ ते ४० हजार ओव्या भारतील एव्हडे साहित्य आहे. जसे – करूनअष्टके, आत्माराम, मनाचे श्लोक, मान पंचक, मानसपूजा, राजकीय पत्रव्यवहार, दासबोध, चौदा ओवी शतके, डेविदेवतांच्या आरत्या, अध्यात्म हा विषय मुख्य ठेवून प्रपंच, स्थापत्य शास्त्र, संगीत, वेदांत, व्यवस्थापन, बँकिंग, कुटुंबनियोजन, समाजकारण, अशा अनेक मनाच्या श्लोकात फक्त २०५ श्लोका मधून मानवाच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श केला आहे. आचार्य विनोबा भावेनी याच मनाच्या श्लोकांना “मानोपनिषद” असेच नावाजले आहे. मनाच्या श्लोकांद्वारे प्रयत्नपूर्वक आपल्याला मनोविकास साधता येतो.
मनाच्या श्लोकातून त्यांनी कर्मयोग, भक्ति योग, ज्ञानयोग, सदाचार, सत्संग, सगुण – निगुण, नामस्मरन, ध्यान, अनेक विषयात स्पष्ट केले आहेत.

मनाचे श्लोक म्हणजे स्वत:च स्वत:ला केलेला उपदेश आहे. कठोप निशदामद्धे शरीराला रथाची उपमा दिलेली आहे. आत्मा या रथाचा मालक आहे. इंद्रिय, घोडे व बुद्धी सारथी आहे व सारथ्याच्या हातातिल लगाम म्हणजेच मन होय.
मनाला एव्हडे महत्व असूनही आज २० व्या शतकातील शिक्षण पद्धतीत आपण फक्त बुद्धीच्या विकासाचा विचार करतो पण मनाचा अजिबात नाही. त्यामुळे अतिशय बुद्धीमान असलेली माणसही मन दुबळे, शरीर रोगट, कमकुवत, फक्त बुद्धीच्याच अधीन गेलेली असतात. परिणाम की काय थोड्याश्या अपयशानेही स्वत:चा शरीराचा त्याग करायला मागे पुढे बघत नाही.
दासबोधाचा विचार करता, समर्थांनी २० दशकात २०० समासांची मांडणी केली आहे. अध्यात्म ज्ञानाप्रमाणेच साधकाला व्यवहारी ज्ञान किती आवश्यक आहे याचे उत्तम उदाहरणं म्हणजे दासबोध होय. अंत:करणाला, बुद्धीला थेट जाऊन भिडणारा स्पष्ट भाषेत उपदेश आहेत. दासबोध हा ग्रंथ ओवीरूप असून गुरु शिष्य संवादाचा रूपात मांडला आहे.
समर्थांनी रामायणावर, हनुमंतावर, देवी स्त्रोत्रे व चरित्रात्मक महाकाव्ये लिहिला आहे. आज लहानपासून ते वृद्धापर्यंत मनाला भावणारे समर्थांचे साहित्य व विचार आपण अभ्यास करणार आहोत.