ज्योतिषशास्त्र

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडणारया घटना जाणून घेण्याची फार ऊत्सुकता असते. भविष्याचे आकर्षण मानवाला अगदी अनादी काळापासून आहे. आपल्या पुढील आयुष्यात काय आहे, आयुष्याची दोरी किती लांब आहे हे जाणून मग त्यानुसार आयुष्याचे नियोजन करणे आवडते. त्यात आपले शिक्षण, लग्न, वैवाहिक जीवन, मुलेबाळे त्यांचे करियर अशी चिंता सतावत असते. व्यवसायात, धंद्यात किती पैसा मिळेल, व जीवनात कशा प्रकारच्या घडामोडी होतील याची मोठी ऊत्सुकता असते.
यासाठी व्यक्तीच्या जन्माची तारीख महिना साल, जन्म वेळ व जिल्ह्याचे ठिकाण इत्यादी एकदम बरोबर असावे लागते. व मग या माहितीतून तयार होणारी कुंडली म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य होय. ग्रहांचे अंश, नक्षत्र, दृष्टी, युती, ग्रहांचे वक्री, स्तंभी वा मार्गी असणे इत्यादीवरूनकुंडली बनते व त्याच कुंडलीच्या माध्यमातून अभ्यासक भविष्यातील घटनांचा मागोवा घेतो. व यालाच भविष्य असे म्हणता येईल.