daily horoscope

शनिवार 28 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 28 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 28 आँगस्ट 2021 चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी 27:33 पर्यंत व
नंतर कृतिका.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या
कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
अश्र्वत्थ मारूती पूजन.
मेष :–तुमच्या मदतीने लहान भावंडाने सुरू केलेल्या व्यवसायात चांगली प्रगती होत
असल्याचे जाणवेल. इतरांच्या आग्रहावरून अचानक मोठी खरेदी करून खूप पैसे खर्च
कराल.

वृषभ :–प्रतिस्पर्ध्यांबरोबर आज अचानक संबंध सुदृढ होत असल्याचे जाणवेल. आईच्या
नावावर असलेल्या जमिन जुमल्याबाबत विकण्याचे विचार सुरू होतील.

मिथुन :–आज तुम्हाला अचानक पित्ताचा त्रास सुरू होईल. आईच्या प्रकृतीची काळजी
करावी लागेल. वडीलांना प्रवासात दुखापतीचा धोका आहे तरी काळजी घ्यायला सांगा.

कर्क :–संततीच्या आरोग्याची काळजी घेता घेता आज तुम्हाला आजारपण आल्याचे
जाणवेल. आज तुम्हाला सासुबाईंकडून गोड भेट मिळणार आहे. दिवस दगदगीचा
जाईल.

सिंह :–नोकरीत सहकारी आश्र्चर्यजनक गोड धक्का देतील. महिलांना आपल्या क्षमता
सिद्ध केल्याने मनापासून आनंद होईल. घरगुती औषधांचा उपयोग झाल्याचे जाणवेल.

कन्या :–महिलांना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो. घरातील नोकर चाकरांकडून
चांगले सहकार्य मिळाल्याचा आनंद होईल. गर्भवती महिलांनी आज जास्त दगदग करू
नये.

तूळ :–वडीलांचे परदेशी जाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्यांचे संकेत
मिळतील. मोठ्या भावंडांचा वेदनादायी आजार बळावल्याने तुम्हाला मानसिक त्रास
होईल.

वृश्र्चिक :–ज्येष्ठ संततीच्या व्यवसायातील झालेल्या आर्थिक लाभाचे क्रेडीट तुम्हाला
मिळेल. शिजवलेल्या अन्न ठेवण्याच्या जागेच्या स्वच्छतेच्या कामात तुम्ही जातीने
लक्ष घालाल.

धनु :–अधिकारी वर्गाला कनिष्ठ फळीतील कर्मचार्याकडून कामातील प्रगतीचे रिपोर्ट
प्रतिष्ठा वाढवतील. भागिदारांबरोबर आज कोणताही व्यवहार करू नका.

मकर :–वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रसंगी दवाखान्यात अँडमिट करावे
लागेल. अजोळकडील नात्यातील मंडळींच्या मदतीने व्यवसायातील अडचणींवर मार्ग
मिळेल.

कुंभ :–आज अचानक उच्चशिक्षणाचे विचार बदलतील व नकोसे वाटेल. ज्या वाहनाच्या
विक्रीसाठी प्रयत्न करत होता त्याची चांगली किंमत येईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या
सल्ल्यानेच महत्वाचे व्यवहार करा.

मीन :–लाचलुचपतीच्या व्यवहारापासून सावध रहा. अधिकारी वर्गाने आर्थिकव्यवहारात
कोणावरही विश्र्वास ठेवू नये. वयस्कर शेअर्सच्या व्यवहारात जबरदस्त फायदा होईल.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *