daily horoscope

शुक्रवार 27 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 27 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 27 आँगस्ट चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 24:46 पर्यंत व नंतर
भरणी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली
नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
श्रावण कृष्ण पंचमी. शुक्रवार जरा – जिवंतिका पूजन.
मेष :–आजचा दिवस अगदी आनंदात व उत्साहात जाणार आहे. मनातील हातातील
कामांचे नियोजन करा. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन केल्यास कामे आटोक्यात येतील.

वृषभ :–विद्यार्थ्यांनी आज कोणत्याच स्पर्धात्मक कामात भाग घेऊ नये. दैनंदिन
कामांना मार्गी लावाल. व्यवसायातील अडचणींसाठी किंवा नवीन नियोजनात मित्रांकडून
उसने घेऊ नका.

मिथुन :–आज तुमचे व्यक्तिमत्व उजळणार्या घटना घडतील. कायद्याचे तुमच्या
कडून झालेल्या उल्लंघनामुळे आज दंड भरावा लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणी काम
जास्त करावे लागणार आहे.

कर्क :–आज तुमच्या सानिध्यात अतिशय शांत व मनमिळावू व्यक्ती बरोबर भेट होईल.
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीला मार्गदर्शन करावे लागणार आहे.
उत्तम मार्गदर्शकचा किताब मिळेल.

सिंह :–वकिल मंडळीना आजचा दिवस अतिशय त्रासाचा व दगदगीचा जाणार आहे.
राजकीय मंडळीनी स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी गप्प व शांत रहावे.आज कोणत्याही
प्रकारची गुंतवणूक करू नये.

कन्या :–मेडिकलच्या क्षेत्रातील सेवा देणार्‍यांना समाजाकडून कौतुकाचे शब्द
मिळतील. चांगले खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांना आपला उद्योग चांगला चालत असल्याची
पोचपावती मिळेल.

तूळ :–आज तुमचा काँन्फरन्स मधील सहभाग बघून सर्वांकडून प्रशंसा होईल.
कोणत्याही क्षेत्रात असलात तरी तुमच्या कार्यपद्धतीवर सर्वजण खूष होतील. घरगुती
व्यवसायातील बदल फायदा करेल.

वृश्र्चिक :– बिल्डींग काँन्ट्रक्टर्स तसेच प्रवासी एजंटना अचानक सरकारी नियमांचा
जाच होईल. कोणतीही अँक्शन घाईघाईने घेऊ नका. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा
मोह होईल.

धनु :–कलाकौशल्याची कामे करणार्‍या कलाकारांना फार मोठ्या आँर्डर्स साठी विचारले
जाईल. कांचसामानाच्या व्यापारांना मोठे मार्केट मिळेल. लहान गोष्टींच्या मागे लागू
नका.

मकर :–गूढशास्त्राची आवड असलेल्यांनी आपला अभ्यासाची दिशा ठरवावी व
तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यास करावा. रूढीबाह्य वर्तणूक करणार्यांना सामाजिक
स्तरांवर त्रास होईल.

कुंभ :–कारखानदारांना कोर्टाची नोटीस येण्याचा धोका आहे. विजेच्या उपकरणांच्या
दुरूस्तीच्या कामातून चांगली आर्थिक मदत होईल. वृद्धांनी आपल्या डोक्यातील राग
कमी करावा.

मीन :–मिठाईचे व्यापारी किंवा शीतपेयांच्या विक्रीतून अचानक मोठा आर्थिक लाभ
होईल. उंची व चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. वडीलांकडून मानसिक आनंद देणार्‍या
घटना घडतील.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *