Read in
गुरूवार 26 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य.
गुरूवार 26 आँगस्ट चंद्ररास मीन 22:28 पर्यंत व नंतर मेष.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्र नक्षत्र रेवती 22:28
पर्यंत व नंतर अश्र्विनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या
पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत
आहे.आज बुधाचा कन्या राशीतील प्रवेश 11:18 ला होत आहे.
मेष :–कुटुंबातील सर्वांबाबतीत व बाहेरील जिवाभावाच्या मित्रांबाबत काळजी वाटणारे
प्रसंग घडतील. नोकरी व्यवसाय तसेच परदेशी व्यवहाराबाबत यांबाबत काटेकोर रहावे
लागेल.
वृषभ :–नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरल्याचे कळवले जाणार आहे. इतरांना
महत्व देताना स्वत:कडे दुर्लक्ष करू नका. मित्रमंडळींच्या बरोबर आनंद साजरा कराल.
मिथुन :–मित्रमंडळींच्याबरोबर अचानक वाद निर्माण होईल तरी मनावर संयम ठेवावा
लागेल. व्यवसायातील भागिदारांबरोबर जुळवून घ्यावे लागेल.
कर्क :–मित्राच्या वडीलांना भेटायला जाल तर अचानक तुम्हाला आवश्यक असणारा
सल्ला मिळेल तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. कलागुणांना अचानक वाव मिळेल.
सिंह :–पुरूषांचे सासुरवाडीबरोबर वैचारिक मतभेद होण्याचा धोका आहे. कलाकार व
साहित्यिकांना मनाला समाधान देणार्या घटना घडणार आहेत. चित्रकाराची ज्येष्ठ
कलाकारांबरोबर भेट होईल.
कन्या :–आज नोकरीच्या ठिकाणी होणार्या मिटींगमधे सरकारी नोकरीत ज्यादा
कामाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मिटींगमधे इतरांच्या मताना महत्व द्या.
तूळ :– अचानक पित्ताशयाचा न समजणारा त्रास उद्भवेल. व्यवसायात नोकरांकडून
नुकसान होणार्या घटना घडतील. आज व्यवसायाबाबत फारशा फायदेशीर गोष्टी
घडणार नाहीत.
वृश्र्चिक :–तुम्ही स्पर्धात्मक यशाच्या मागे लागू नका. आजचा दिवस वाया जाईल.
जुगार सदृश किंवा गुंतवणूकीतून आज नुकसानीचा दिवस आहे. एकतर्फी प्रेमाचा त्रास
संभवतो.
धनु :–मुलांच्या अभ्यासाच्या जबाबदारीचा विचार करूनच पुढील मार्ग ठरवावा लागेल.
नाट्यकलाकारांना नवीन कामाची चांगली संधी मिळेल. अती चिकित्सा करू नका.
मकर :–मुलांच्या क्षमता तपासूनच निर्णय घ्या. मुलांच्या मताला अती महत्व देऊ नका.
वयस्कर मंडळीना विस्मरणाचा त्रास संभवतो. लहानशा प्रवाशाने सुध्दा आज दमायला
होईल.
कुंभ :–बालसुधारगृहामधे काम करणार्या कर्मचार्यांकडून मनाला समाधान देणार्या
घटना घडतील. कलाकारांचे नावलौकिक वाढेल व मानही मिळेल. मैदानी खेळाडूंना
चांगले यश मिळेल.
मीन :–कुटुंबातील व्यक्तींबरोबर वागताना नोकरीतील कोणत्याही प्रकारचा ताण
जवळ ठेवू नका. आज महिलांना धनार्जनाचे नवीन घरगुती उद्योग करण्याची इच्छा
निर्माण होईल.
| शुभं-भवतु ||