daily horoscope

बुधवार  25 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार  25 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 25 आँगस्ट चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 20:47 पर्यंत व नंतर रेवती.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व
आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय  21:06. गणेश भक्तांनी श्री गजाननाची उपासना करावी. 

मेष :– पूर्वी कधीतरी घडून गेलेल्या गोष्टींविषयी उगाचच चर्चा घडणार आहे. नोकरीत सन्मानाचे प्रसंग येथील व वातावरण पण आनंदाचे राहील. कोणालाही उत्तराला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका.

वृषभ :– मित्रमंडळींबरोबरच्या चर्चेतून  निर्माण होणार्‍या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्याच चर्चेतून सापडतील. महिलांच्या घरगुती कामात घरातील पुरूष मंडळींची मदत मिळेल.

मिथुन :–मित्रमंडळींचा  विरोध  स्विकारून ही  नको त्या कामामध्ये हात  घालाल.  आई वडीलांबरोबर चर्चेतून अतिशय उपयोगी निर्णय घेतला जाईल.

कर्क :–वडीलांकडून मिळालेल्या सल्ल्यामुळे फायदा होईल. तरूणांनी  आपल्या मनावर संयम ठेवावा. आज मनाप्रमाणे वागण्याचा हट्ट करू नका.

सिंह :–व्यवसायापेक्षा नोकरीमध्ये पुन: सुरूवात करण्याच्या संधी निर्माण होत असल्याचे कळेल. ज्येष्ठांचा विचार घेतल्याशिवाय कांहीही निर्णय घेऊ नका.

कन्या :–आज दिवसभर कामातच गुंतून रहाल जराही स्वत:साठी ही वेळ मिळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी चालून येईल. 

तूळ :–अती विश्र्वास ठेवलेली व्यक्ती विश्र्वासात पात्र असल्याचे जाणवेल. तरूण तरूणींना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. कायदा मोडत नाही याची खात्री करून घ्या. 

वृश्र्चिक :–परदेशीय व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना उत्तम संधी मिळणार असल्याचे कळेल. तुमचा आर्थिक स्तर उंचावल्याचे जाणवेल. 

धनु :–आजचा दिवस अतिशय आनंदाचा व सुखाचा जाणार आहे. नोकरीतील गटबाजीपासून दूर राहणे पसंत करा. कोणाच्याही बाजूने तुमचे मत व्यक्त करू नका. 

मकर :–बर्‍याच दिवसापासून मनात असलेल्या प्रश्र्नांवर चर्चा करणे महत्वाचे ठरेल. उशीर केल्यास नुकसान होईल. आज कोणत्याही प्रकारची खरेदी करू नका. 

कुंभ :–मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. शैक्षणिक संस्थेमधे काम करणार्‍या कामगारांना अचानक येणारे नियम जाचक ठरतील. शांतता महत्वाची ठरेल. 

मीन :– दुपारनंतरचा वेळात महत्वाची कामे काढा. राजकीय व्यक्तींचा सहवास त्रासदायक  होणार आहे. दवाखान्यातील नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. 

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *