Read in
मंगळवार 24 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 24 आँगस्ट चंद्ररास कुंभ 13:37 पर्यंत व नंतर मीन.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा
19:46 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व
आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
श्रावण शुक्ल कृष्ण द्वितीया मंगळागौरीच्या व्रताची पूजा.
मेष :–मानसिक त्रास होणार्या घटनांचा तीव्रपणा कमी येऊ लागल्याचे जाणवेल. तुमच्या
आवडत्या गोष्टींना कुटुंबातील व्यक्तींकडून महत्व दिले जाईल. एखादी नवीन संधी चालून
येईल.
वृषभ :–कुटुंबात तुमच्या कडून इतरांच्या मताला विरोध होईल. विवाहिताना आपल्या
जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. तातडीच्या कामासाठी प्रवास करावा लागेल.
मिथुन :–अचानक होणार्या धनलाभाने सुखावून जाल. आईवडीलांच्या प्रेस्टीजमुळे
मार्केटमधील तुमचा रूबाब वाढेल. परिचयाच्या व्यक्तीबरोबर विवाहाचा विचार करावा
असे वाटेल.
कर्क :–नव्या प्रोजेक्टचा मुहूर्त करण्याचे निश्चित होईल. सरकारी रेंगाळलेल्या कामातील
क्लिष्टता वाढेल. कोणत्याही विषयावरील निर्णय सहविचाराने घेतल्यास सुखावह होईल.
सिंह :–वयस्कर मंडळीना का दुखण्याचा त्रास संभवतो. मुलांच्या व्यवसायातील अडचणी
तुमच्या मार्गदर्शनाने सुटणार आहेत. मार्गदर्शनात घाई करू नका.
कन्या :–नोकरीतील प्रश्र्नांना प्राधान्य द्यावे, दिल्यास मनातील प्रश्र्नांची उत्तरे मिळतील.
सरकारी अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वाच्या दिशेने जातील. विद्यार्थ्यांना नावडत्या
विषयासाठी स्पेशल मिळेल.
तूळ :–सरकारी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागेल, मनाप्रमाणे व सोयीनुसार
करता येणार नाही. राजकीय क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या स्पर्धकांपासून आज त्रास
जाणवेल.
वृश्र्चिक :–व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी जोडीदाराबरोबर व भागिदारांबरोबर
समजून घेण्याचा विचार करा. थोड्याश्या प्रयत्नाने ही तटलेली, अपूर्ण असलेली कामे पुन:
सुरू कराल.
धनु :–दुसर्यांच्या कामासाठी मध्यस्थी करू नका. कुटुंबातील महत्वाच्या प्रश्र्नांसाठी मोठी
गहन चर्चा करावी लागेल. स्वत:च्या मालकीच्या जागेत नवीन कांहीतरी व्यवसाय करायचा
विचार कराल.
मकर :–सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका. विजेच्या उपकरणांपासून महिलांना खूपच
काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांकडून तुमच्या घरगुती अडचणींवर अचूक उपाय
सापडेल.
कुंभ :–मित्रमैत्रिणींबरोबर झालेल्या वादावर पडदा टाकायचा असेल तर प्रथम तडजोड
करण्याची तयारी ठेवा. आज कोणत्याही प्रकारची खरेदी करू नका फसगत होणार आहे
मीन :–मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर प्रथम मनाला मुरड घाला.
हातातील पैशांचा वापर काटकसरीने न करण्याने आज पश्चात्ताप होईल.
| शुभं-भवतु ||