Read in
सोमवार 23 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 23 आँगस्ट चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 19:25 पर्यंत व
नंतर पूर्वा भाद्रपदा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील रास व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30
च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
श्रावणी सोमवार , शिवपूजन व शिवामूठ मुग आहे.
मेष :–तुमच्या रिलेशनवर इतरांकडून उत्तम तर्हेने काम करवून घ्याल. नोकरीत
सर्वांबरोबर चांगले संबंध राहतील. जवळच्या नात्यातून तुमच्या भरवशावर मोठी
जोखीम सोपवली जाईल.
वृषभ :–नोकरीत व कुटुंबातही ज्येष्ठांबरोबर वैचारिक मतभेद होतील. महिलांना
अचानक पोटदुखीचा पोटदुखीचा त्रास जाणवेल. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी
तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.
मिथुन :–तुम्हाला आज अतिशय बळकट प्रसिद्धीचे योग आहेत. तुमच्या क्षेत्रातील
कामाच्या पद्धतीतील नियोजन तुमच्या कल्पनेनुसार व्यवस्थितपणे करता येणार
आहे.
कर्क :–पुरूष मंडळीना अचानक कुटुंबातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी फारच
विचार करावा लागेल. दुसर्यांची जबाबदारी घेताना तुम्हाला पेलवणार आहे काय याचा
प्रथम विचार करा.
सिंह :-आज दुपारनंतरचा वेळ एखाद्या मोठ्या कामासाठी देता येईल करीतसे नियोजन करा.
हातातील संधी जाणार नाही याची दखल घ्या. डाव्या पायाच्या त्रासावर औषध सापडेल.
कन्या :–नोकरीतील बरीच दिरंगाई केलेल्या कामासाठी वरिष्ठांकडून समझ मिळेल तरी
सावध रहा. आज तारीख असलेल्यांनी कोर्टाच्या कामात अजिबात लुडबूड करू नका.
तूळ :–महत्वाच्या कामाबाबतचा तुमचे अंदाज अगदी बरोबर निघतील. व्यवसायातील कामे
वेळेवर रडण्याचे महत्व कळून येईल. प्रतिष्ठेच्या कामांमधील गुप्त गोष्टींची वाच्यता करू नये.
वृश्र्चिक :– अगदी साध्या क्षुल्लक कारणासाठी लहानशा प्रवास कराल. नोकरीमध्ये आज
आनंददायक वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीरीने वागू नका.
धनु :–पाळीव प्राण्यांच्या बाबतीत त्यांना दवाखान्यात न्यावे लागेल.वयस्कर मंडळीना
व्हायरल फिव्हरचा त्रास संभवतो. पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
मकर :–प्रवासाच्या नियोजनात बदल करावा लागेल.ज्यांचे विवाह लांबले आहेत अशांनी
आता आपल्या अटी शिथील केल्यास आजचा दिवस उपयोगी पडेल. बोलण्यात आढ्यता ठेवू
नका.
कुंभ :–कुटुंबात धार्मिक पूजेचे नियोजन कराल. मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत आज
अचानक फारच काटेखोर व्हाल. पाठदुखीने त्रस्त झालेल्यांना आज प्रमाणापेक्षा जास्त दगदग
होईल.
मीन :– फार दिवसांनी आवडत्या व्यक्तीची भेट होईल व मन मोकळे करता येणार आहे.
महिलांना आज अतिशय सुखद अनुभव येईल. कुटुंबात एकत्र पंगतीचा अनुभव घ्याल.
| शुभं-भवतु ||