Read in
शनिवार 21 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 21 आँगस्ट चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 20:21 पर्यंत व नंतर धनिष्ठा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस आहे. श्री मारूतीची उपासना करावी.
मेष :–दिनांक 23 व 24 तारखेला डणार्या घटनांची सूचना आज मिळणार आहे. त्यानुसार नियोजन
करा. पूरूष मंडळींना सासुरवाडीच्या नाश्त्यासाठी पाहुणचार करावा लागणार आहे.
वृषभ :–सेवाभावी वृत्तीने काम करणार्यांना त्यांचे मित्रमंडळी मानसन्मान करतील. वृद्धाश्रमातील
कर्मचार्यांच्या कामाचे विशेष कौतुक होईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना स्तुती करणारे भेटतील.
मिथुन :–महिलां डोक्यावर असलेल्या कर्जातून मुक्त होण्याचे नियोजन करतील. बांधकाम
व्यवसायातील अडकलेले काम सुरू करून थटलेले पैसे येण्याचे मार्ग खुले होतील.
कर्क :–वकील मंडळींची अशिलांकडून आर्थिक फसगत होईल. सरकारी योजनांच्या कामातून मिळणारे
उत्पन्न अचानक कमी होईल. तरूणांनी डोके शांत ठेवावे.
सिंह :–संकटे कधीच सांगून येत नाहीत हे लक्षांत ठेवल्यास संकटाची चाहूल लागेल. इतरांच्या
भरवशावर अवलंबून राहिल्यास नुकसान होईल.
कन्या :–सकाळच्या वेळी गर्भवती महिलांना ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो. घरातील व्यवहारातील
अडचणी दुसर्यांवर न सोपवता स्वत: सहभाग घेतल्यास मार्गी लागतील.
तूळ :–जून्या प्राँपर्टीच्या चर्चेत इतरांकडून तफावत जाणवेल. वयस्कर मंडळींच्या डोक्याला दुखापत
होण्याचा धोका आहे. घरात राहिलात तरी दुखापतीचा धोका आहे.
वृश्र्चिक :–आर्थिक गणिते सोडवताना जोडिदाराची मदत घ्यावी. आज क्रोधाचा अतिरेक होण्याची
शक्यता आहे तरी नियंत्रणाची आवश्यकता आहे.
धनु :–आज तुमच्या मनातील कल्पनाना कुटुंबियांची सकारात्मक साथ मिळेल. सद्ध्या हातातील
प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केल्याने कामात झालेली वाढ वरिष्ठांच्या लक्षात येऊन तुमचे कौतुक होईल.
मकर :– कुटुंबात घराण्यातील कुलदेवतेचा पूजा अर्चा करण्याचा बेत ठरेल. नातेवाईकांची भेट कुटुंबात
चैतन्य आणेल. महिलांना अचानक प्रसिद्धी मिळेल.
कुंभ :–लेखकांना त्यांच्या नकारात्मक राजकीय लेखांबद्दल जाब विचारला जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ
मंडळींच्या विचाराने घरातील बरेच महत्वाचे प्रश्र्न सोडवाल.
मीन :– मित्रमैत्रिणीच्या कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तुम्हाला विचारले जाईल. न्यायालयातील
कर्मचार्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करावी. सततच्या कामाने
विश्रांतिची गरज भासेल.
| शुभं-भवतु ||