Read in
शुक्रवार 20 आँगस्ट 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 20 आँगस्ट चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 21:14 पर्यंत व नंतर श्रवण.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज श्रावण शुक्रवार असल्याने जरा- जिवंतिकेचे पूजन करावे. तसेच आज प्रदोष असल्याने सायंकाळी
श्री महादेवाची पूजा उपासना करावी.
मेष :–तुमच्या कातातील कामाचे अचानक स्वरूप बदलेल व दिशाही बदलणार आहे. मनाची
चलबिचलता वाढल्याने आज कोणताच निर्णय घेऊ नका.
वृषभ :–आजारी असलेल्यांनी बेफिकीर न राहता प्रकृतिची विशेष काळजी घ्यावी. न्यायालयात
असलेल्या केसबाबत गूढ निर्माण होईल. कोणाविषयी ही तुमच्या मनातील विचार व्यक्त करू नका.
मिथुन :–नोकरी मधील गुप्त गोष्टींबद्दल तुम्ही फलवले जाल. तरी आज करण्यातयेणारे
सर्वचव्यवहार काळजीपूर्वक करा.
कर्क :–आजचा दिवस व्यवसाय वृद्धीसाठी अतिशय लाभदायक राहणार आहे. आईवडीलांच्या
व्यवसायातील कांही अधिकार तुमच्याकडे सोपविण्याची चर्चा होईल.
सिंह :–महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता
शांततेने विचार करूच निर्णय घ्यावा.
कन्या :–महिलांना मित्रमंडळींच्या गरजेकरीता आर्थिक भार सोसावा लागेल. पायाच्या दुखण्यासाठी
डाँक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. आज कोणतेच काम ठरलेल्या वेळेत होणार नाही.
तूळ :–कुटुंबातील लहान व्यक्तीकडून व्यक्त केलेला विचारतुमच्यासाठी महत्वाचा ठरेल. राजकीय
मंडळीनी गुप्तशत्रूं पासून अतिशय सावध राहण्याची गरज आहे. कोणतीही घाई करू नका.
वृश्र्चिक :–नवीन नोकरीचे वेध लागलेल्यानी आज घाई करू नका. आजचा दुपारनंतरचा वेळ खूप
घाईगडबडीत जाईल.
धनु :– कुटुंबियांबरोबर केलेल्या गप्पांमुळे रिफ्रेश व्हाल. सरकारी कर्मचार्यांना अचानक कामाबाबत
उत्साह वाढेल व कामाचा उरकाही होणार आहे.
मकर :–मनातील विचार वार्याच्या वेगाने धावतील. आजचा दिवस आनंदाचा व समाधानाचा राहील.
आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी अतिशय काळजी घ्यावी.
कुंभ :– आज तुम्हाला संमिश्र स्वरूपाचा अनुभव येईल. गेले आठवडाभर केलेल्या कामातून बरेच काम
परत करावे लागेल. आजूबाजूला त्रासदायक घटना घडतील.
मीन :–ज्यांच्याकडून काम करवून घ्यायचे आहे त्याच्याबरोबर गोड बोला त्याला अपमानित करू नका.
आज तुम्हाला इतरांकडून आवश्यक त्या प्रकारची मदत मिळेल.
| शुभं-भवतु ||